रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील निवडक ५० शाळांमध्ये डिजिटल वर्गखोल्या सुरू केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेता येणार आहे.
प्रत्येक वर्गात स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात आणखी शंभर शाळांचा समावेश करण्याचे नियोजन आहे असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
प्रतिक्रिया (0)